राम नसुन हा रावण, रावणाचे दहन करा – धनंजय मुंडे

महाराष्ट्राचा विकास गृप्त झाला

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दिलेल्या विहीरी त्यांना मिळाल्या नाहीत मग या विहीरी गुप्त आहेत त्या फक्त भाजप वाल्यांनाच माहीत आहेत. हे सरकार आम्ही शेतकर्‍यांना शेततळे दिली आसे सांगतो, मात्र ४५ हजारात शेततळे यांच्या बा ने केले होते का? महाराष्ट्रात ३८ कोटी वृक्षलागवड केली म्हणता पण प्रत्यक्षात वृक्षलागवड कागदावरच राहिली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचा विकास गृप्त झाला आहे.

जामखेड – गेल्या दहा वर्षांपासून कर्जत जामखेड चा विकास खुंटलेला आहे. मात्र रोहित पवार यांच्या माध्यमातून आपल्या नविन चेहरा मिळाला आहे. त्यामुळे येत्या एकवीस तारखेला राम शिंदे यांना पायउतार करा कारण राम यांचा रावण झाला असुन त्याचे दहन करण्याची वेळ आली आहे असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जामखेड येथील सभेत लगावला.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार रोहित पवार पवार यांच्या प्रचारार्थ बुधवार दि १६ रोजी शहरातील बाजारतळ या ठिकाणी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा संपन्न झाली.

यावेळी उमेदवार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रा मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जामकावळे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, सरपंच दादा सरनोबत, सुर्यकांत मोरे, माजी जिल्हा अहिल्यादेवींचे मुळ वंशज अक्षय शिंदे, सुरेश भोसले, रमेश आजबे, शहाजी राळेभात, चंद्रकांत राळेभात, सुरेश भोसले, सुनील लोंढे, सुनिल कोठारी, अमोल गिरमे, प्रशांत राळेभात, गजाजन फुटाणे, जुबेर सय्यद, आमृत महाराज डुचे, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा राम शिंदे यांना मी दहा वर्षांपूर्वी आत्ता राष्ट्रवादी मध्ये आसलेले तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे व राजेंद्र गुंड या दोघांना डावलून उमेदवारी दिली ते दोघेही आज या स्टेजवर आहेत. दहा वर्षांत त्यांनी जे भोगलं त्यांची मी माफी मागतो. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस मधुन जे नेते भाजप मध्ये गेले त्यांची आधिच चव चव झाली होती त्यामुळे त्यांच्या जाण्याने कोणाला वाईट वाटत नाही.

मुख्यमंत्री सांगतात आमच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही, मी विधानसभेत पुरावे दिले आहेत यावर कोणीच बोलत नाही ते पुरावे खोटे निघालेत तर मला फाशी द्या? शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र जेवढी विमानतळे केली तेवढी गुजरातला बस स्टॅन्ड देखील झाली नाहीत असा टोला देखील अमित शहा यांना लावला.हे सरकार ईडी ची भीती दाखवुन शरद पवारांना संपवायला निघाले आहेत. मात्र आमच्या सारखे लाखो तरुण मावळे राष्ट्रवादी मध्ये आहेत तो पर्यंत राष्ट्रवादी संपु शकणार नाही.या विधानसभा वेळी महाराष्ट्रत परीवर्तन होणार हे आता निश्चित झाले आहे.

कारण शिवसेनेने भाजपचा उमेदवार जीथे उभा आहे त्या ७२ ठीकाणी बंडखोरी केली आहे. तर भाजपने देखील शिवसेनेचे उमेदवार जीथे उभे आहेत त्या ६९ ठिकाणी बंडखोरी केली आहे मग युती कशी म्हणायची त्यामुळे आमचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. माझ्या दृष्टीने विकास म्हणजे काय तर पाच वर्षांत लोकांचे उत्पन्न दुप्पट करणे हा होय. बारामतीसारखा विकास रोहीत पवार कर्जत जामखेड चा करु शकतात याची मी ग्वाही देतो. तुम्ही राम शिंदे यांना लाखोंच्या मताने पाडा मी त्यांच्या वनवासाची सोय मी करतो असा टोला देखील शिंदे यांना मुंढे यांना लावला.

यावेळी रोहित पवार म्हणाले की कार्यकर्ते उन्हात तर आम्ही पण उन्हात पण काही दिवसातच तुम्हाला सावली देण्याचे काम करणार आहे. शहरात पिण्याच्या पाण्याच्या टँकर मध्ये घोटाळा झाला आहे. त्रास देणारे लोक संपवा त्यामुळे आम्हाला परीवर्तन पाहीजे पालकमंत्र्यांची दहशत दमबाजी च्या माध्यमातून पसरवत आहेत. छावण्यांच्या नावावर मते मागत फीरत आहेत मात्र सर्व छावण्यांमध्ये देखील भ्रष्टाचार झाला आहे.

उद्याच्या काळात आपल्याला कुकडीचे पाणी आणुन नगदी पीक बदलायचे आहे,सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार अणायचा आहे, विकास न झाल्यानेच जामखेड येथील बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. पालकमंत्र्यांनी पाण्याच्या टँकर आपल्या कार्यकर्त्यांना देऊन कार्यकर्ते मोठे केले व दुसरीकडे लोक तहानलेलेच राहीले आहेत. कर्जत जामखेड ची निवडणूक ही सर्व सामान्य जनतेने हातात घेतली आसल्याने बदल होणारच आहे. २१ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढील पाच वर्षांची जबाबदारी माझी राहील असे भावनिक आवाहन देखील रोहित पवार यांनी उपस्थितांना बोलताना केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.