पुणे – आपल्या दातृत्वाच्या जोरावर करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रतन टाटा त्यांच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. त्याच झालं असं की, टाटा यांच्या उद्योगसमूहात काम करणारी एक व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून आजारपणाशी झुंजत आहे. याबातची माहिती टाटा यांच्या कानावर पडली असता त्यांनी थेट मुंबई ते पुणे असा प्रवास करत ‘त्या’ कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे.
विशेष म्हणजे, टाटांनी याबाबत कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या घरी उपस्थिती लावत त्याच्या प्रकृतीची विचारणा केली. यावेळी टाटांसोबत ना सुरक्षा रक्षक होते ना इतर कोणता लवाजमा. एवढंच काय तर आपल्या या कृतीची वाहवाह व्हावी म्हणून त्यांनी याबाबत साधी वाच्यताही केली नाही.
मात्र भेट दिलेल्या कुटुंबियांच्या एका मित्राने याबाबत लिंक्डइनवर पोस्ट करत माहिती दिल्याने टाटांच्या या कौतुकास्पद कृतीची माहिती सर्वांपर्यंत पोहचली आहे. या पोस्टवर अनेक जण आता रतन टाटा यांच्या या कृतीचे भरभरून कौतुक करताना दिसतायेत.
आजकाल एखाद्याला दोन पैशाचीही मदत केली तरी त्याचा समाज माध्यमांवर गाजावाजा करण्याची संस्कृती दृढ होताना दिसत आहे. मात्र रतन टाटा यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर पुन्हा एकदाआदर्श निर्माण केला असून त्यांचे हे कृत्य पैशांमागे, प्रसिद्धीमागे धावणाऱ्या तरुणांना मार्गदर्शक ठरेल.
@TataMotors @TCS @TataSky @tatadocomo @tatatrusts @TataSteelLtd https://t.co/Xu58nOyRZL
— RAGHUNANDAN MAACHANA (@RMaachana) January 4, 2021