Rashmika Mandana : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) अॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सध्या कौतुक केले जात आहे. मात्र आता रश्मिका तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यात तिने मागील काही दिवसांपासून होत असलेल्या आजरपणाबाबत माहिती दिली आहे. रश्मिकाने शेअर केलेल्या या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंताही व्यक्त केली आहे.
रश्मिकाने 17 डिसेंबर रोजी ट्वीटरवर (एक्स) शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, मला डिस्कचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे मी खूपच त्रस्त झाले होते. त्यावर उपचार सुरु होते. फिजिओनं कशाप्रकारे व्यायाम केला पाहिजे? कोणते उपचार घ्यायला हवेत? याविषयी सांगितले होते. त्यानुसार वेळापत्रकही तयार केले होते. मी वर्कआऊटवर खूपच भर दिला होता. त्यामुळे मला त्याचा फायदा होत आहे. आता त्रास बऱ्याच कमी झाला आहे. मी रोज स्ट्रेचिंग करते आहे. त्याचा फायदा होत असल्याचे रश्मिकानं म्हटले आहे. रश्मिकाची पोस्ट सध्या सोशल मीडियायावर व्हायरल होत आहे.
I had a disc bulge- I gave it a rest for about a week and after a week did physio then slowly got back to doing normal stability workouts.. to strengthen the back muscles.. and I do stretching almost everyday.. ❤️
— Rashmika Mandanna (@iamRashmika) December 17, 2023
दरम्यान, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल चित्रपटामध्ये रश्मिका मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटानं आतापर्यत जगभरातून 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि बॉबी देओलरश्मिका मंदाना, शक्ती कपूर, अनिल कपूर, सुरेश ऑबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अॅनिमल चित्रपटानंतर रश्मिका ‘पुष्पा 2′- द रुल’ मध्ये दिसणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलच्या आतुरतेने वाट पाहत आहेत.