Sai Lokur : अभिनेत्री सई लोकुरने (Sai Lokur) आई होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सई आणि तिचा नवरा तिर्थदीप रॉय आई-बाबा झाल्याचे तिने सांगितले आहे.17 फेब्रुवारीला सईने मुलीला जन्म दिला आहे.
सईने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करताना असे म्हटले आहे की, ‘मुलगी जन्माला आली आहे. ती निरोगी आणि सुंदर आहे.. सर्वांचं तिच्यावर खूप प्रेम आहे. या विशेष काळात तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत’. तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले, ‘एका छोट्या गोंडस चेहऱ्याच्या रुपात देवाचा आशिवार्द…आमच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत’. सईने शेअर केलेल्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सईने नोव्हेंबर 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सईने बंगाली आणि मराठी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर आता दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आई-बाबा झाले आहेत. दरम्यान, सईने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती पाहायला मिळाली. बिग बॉस मराठीमध्ये देखील दिसली. या शोमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.