नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमानांच्या भारतातील आगमनाचे स्वागत केले. त्यासाठी त्यांनी संस्कृतमधून ट्विट करत स्वागतम् असे म्हटले. राष्ट्ररक्षणासारखे कुठलेच पुण्य आणि व्रत नाही. राष्ट्ररक्षणाची बरोबरी करू शकणारा यज्ञही नाही, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
ट्विटसमवेत त्यांनी अंबाला हवाई तळावर राफेल विमाने उतरत असल्याचा व्हिडीओही शेअर केला.
राष्ट्ररक्षासमं पुण्यं,
राष्ट्ररक्षासमं व्रतम्,
राष्ट्ररक्षासमं यज्ञो,
दृष्टो नैव च नैव च।।
नभः स्पृशं दीप्तम्…
स्वागतम्! #RafaleInIndia pic.twitter.com/lSrNoJYqZO— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2020