‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’ म्हणणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर आता सिंग यांच्यावरच गुन्हे दाखल होण्यास सुरुवात होत आहे, सिंग यांच्यासह पाच पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यासह 28 जणांविरोधात खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी यासारख्या 10 हून अधिक कलमांतर्गत ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 वर्षानंतर याची दखल ठाणे नगर पोलिसांनी घेतली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त दिपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी सह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी तक्रारदार आणि त्यांच्या साथिदारांकडून वसूल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुख्यात गुंड रवि पुजारी आणि प्रदीप शर्मा यांचे हितसंबंध असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, परमबीर सिंग  यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लगावला होता. त्यासाठी त्यांनी एक पत्रदेखील प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता सिंग यांच्यावरच खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.