Pune : तीन महिन्यांत करोनाने 5 हजारांवर मृत्यू

पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यातील 61 ते 100 वयोगटातील सर्वाधिक व्यक्तींचा करोनामुळे मृत्यूझाला आहे. त्यातही 71 ते 80 वयोगटातील मृतांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 11 टक्के आहे. त्यापाठोपाठ 81 ते 90 आणि 91 ते 100 या वयोगटातील मृत्युचे प्रमाण साडेदहा ते अकरा टक्‍क्‍यांच्या आसपास असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले.

फेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामध्ये एप्रिलमध्ये बाधित संख्येने उच्चांक गाठला होता. मागील तीन महिन्यांत (मे ते जुलै) जिल्ह्यात एकूण 2 लाख 37 हजार 805 बाधित सापडले. त्यामध्ये 5 हजार 25 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. दरम्यान, ही आकडेवारी भीतीदायक असून, नागरिकांनी सुरक्षा बाळगणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.