नागपूर : सलामीवीर फैज फजलाच्या शतकी आणि वसीम जाफरच्या अर्धशतकीच्या खेळावर विदर्भाने रणजी करंडक स्पर्धेतील राजस्थानविरूध्दच्या दुस-या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८९ षटकात ४ बाद २८८ धावा केल्या आहेत.
Stumps Day 1: Vidarbha – 288/4 in 88.6 overs (M R Kale 29 off 47, A V Wadkar 8 off 16) #VIDvRAJ @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 17, 2019
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भाची सुरूवात खराब झाली. के अहमदने एस. रामास्वामीला २ धावेवर पायचीत करत विदर्भाला पहिला धक्का दिला. त्यानंतर फजलने जाफरच्या साथीन डाव सावरत दुस-या विकेटसाठी १२५ धावाची भागिदारी केली. वसीम जाफर ६० धावावर बाद झाला.
त्यानंतर फजलने गणेश सतीश सोबत तिस-या विकेटसाठी १०९ आणि मोहित काळेसोबत ३६ धावांची भागिदारी केली. फैज फजलने २६७ चेंडूत १३६ धावा केल्या, तर गणेश सतीश ४३ धावा केल्या.
राजस्थानकडून गोलंदाजीत टी. हकने २ तर एस अहमद आणि एम लोमरोरने प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवसअखेर विदर्भाच्या ४ बाद २८८ धावा झाल्या असून खेळ थांबला तेव्हा मोहित काळे २९ आणि अक्षय वाडकर ८ धावावर खेळत होता.