मुंबई : जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू मौलाना आझाद विद्यार्थ्यांनी सोमवारी परीक्षांवर बहिष्कार घातला. पोलिसांनी केलेल्या दडपशाहीविरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. विद्यापीठाच्या अधिकारीने सांगितले की, विद्यार्थी संघटनांनी सोमवारी घेण्यात येत आलेल्या सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकला.
तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने
तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याचा निषेध केला आहे . एसएफआयमधील विद्यार्थ्यांनी चेन्नई, मदुराई आणि कोयंबटूर रेल्वे स्थानकांवर निदर्शने केली. आयआयटी मद्रासचे विद्यार्थी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन रस्त्यावर उतारतले आहे. चेन्नईच्या लोयोला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जामियाच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आज धरणे आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी मुंबईत दाखविली एकजुटता
मुंबईतही शेकडो विद्यार्थ्यांनी जामिया आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांप्रती एकता दाखवली आहे . टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हातात पोस्टर्सवर घेऊन त्याणी दिल्ली पोलिसांचा निषेध घोषणा दिल्या.