रणदीप हुडा बॉलीवूडमधील एक टॅलेन्टेड ऍक्टर आहे. मात्र सध्या तो हॉलीवूडमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करतो आहे. तो थोर म्हणजेच क्रिस हेम्सवर्थचा सिनेमा एक्सट्रक्शनमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. या सिनेमातला त्याचा लुक व्हायरल झाला आहे. यामध्ये रणदीप हुडाने खांद्यापर्यंत लांब केस वाढवलेले दिसत आहेत. त्याच्या हातामध्ये मोठी गन आहे.
यावरूनच त्याचा रोल अगदी ऍक्शनपॅक्ड असणार आहे, याचा अंदाज करता येऊ शकतो. गेल्या वर्षी अव्हेंजर्स एंडगेममचे डायरेक्शन करणाऱ्या जोए रूसोने या सिनेमाची कथा लिहिली आहे. तर सॅम हरग्रेव या नवोदित डायरेक्टरवर एक्सट्रॅक्शनच्या डायरेक्शनची जबाबदारी असेल.
हॉलीवूडमध्ये एवढा ऍक्शनपॅक्ड रोल साकारायची संधी मिळालेला आपण कदाचित पहिलाच भारतीय कलाकार असू, असा अंदाज रणदीपने व्यक्त केला आहे. क्रिस हेम्सवर्थ आणि रूसो ब्रदर्स यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. असेही त्याने म्हटले आहे. ऍक्शन सीनसाठी 10 दिवस रोज 2 तास त्याला प्रॅक्टीस करायला लागली होती. त्यामुळे तो खूपच सरावाने ऍक्शन सीन करू शकला.