मुंबई : रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अशातच रणबीरच्या शमशेरा चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. शमशेराच्या या पोस्टरमध्ये तो एका वेगळ्याच लूक मध्ये दिसून येत आहे. त्याचा लूक पाहून असे वाटते आहे की या चित्रपटातले त्याचे पात्र हे खूप वेगळे असणार आहे. खास गोष्ट ही आहे की रणबीरचा हा पहिला लूक सोशल मीडियावर त्याची पत्नी आलियाने शेअर केला आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊण्टवर रणबीरचा ‘शमशेरा’ मधला हा लूक शेअर केला आहे.
View this post on Instagram
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘शमशेरा’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने सोशल मीडियावर प्रचंड लक्ष वेधले आहे. शमशेरा चित्रपटातील रणबीरच्या फर्स्ट लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. आलियाने फोटो शेअर करताच हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर रणबीरचा फर्स्ट लूक पोस्ट करताना लिहिले आहे की, ही आहे हॉट मॉर्निंग, म्हणजे गुड मॉर्निंग… तिचे चाहते आलियाच्या पोस्टवर सतत प्रतिक्रिया देत आहेत.