Rakul Preet Singh : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्यभूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिची देखील या चित्रपटात एन्ट्री होणार आहे. रकुल शूर्पणखेच्या भूमिकेत दिसाणार असल्याचे म्हंटले जात आहे.
‘रामायण’मधील शूर्पणखाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक नितेश तिवारी रकुल प्रीतच्या संपर्कात आहेत. रकुल या भूमिकेसाठी तयारी दर्शवल्यास ती ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका करणाऱ्या यशच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शूर्पणखेची व्यक्तीरेखा या चित्रपटात महत्त्वाची ठरणार आहे. या भूमिकेसाठी रकुलने लुक टेस्टदिल्याचेही म्हंटले जात आहे. या चर्चा खऱ्या ठरल्यास रकूल प्रीत लग्नानंतर चित्रीकरण करणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी रकुल गोव्यात जॅकी भगनानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
‘रामायण’ सिनेमात रणबीर रामच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर सईला दुजोरा मिळाला. हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलसोबत निर्मात्यांची बोलणे सुरू असल्याचे म्हंटले जात आहे. तर कुंभकर्णाच्या भूमिकेत बॉबी देओल दिसणार आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.