Lara Dutta: मागील काही दिवसांपासून ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत विविध अपडेट समोर आल्या आहेत. यातच या सिनेमात आता अभिनेत्री लारा दत्तची एन्ट्री होणार आहे. कैकेयीच्या भूमिकेत लारा दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल या सारखे सुपरस्टार असताना आता लारा सुद्धा यात झळकणार आहे.
‘रामायण’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे. या सिनेमात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीताच्या भूमिकेत साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. तर रावणच्या भूमिकेत यश दिसत आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल दिसणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘रामायण’ या सिनेमाच्या शूटिंगला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. सनी शिवाय बॉबी देओलला देखील कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी विचारण्यात करण्यात आली आहे. रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या सिनेमाच्या शूटिंगला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. सध्या या सिनेमाच्या कास्टिंगचं काम सुरू आहे.
दरम्यान, नुकतेच बॉबी देओल आणि रणबीर अॅनिमल चित्रपटात दिसले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघे रामायण चित्रपटात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रामायणासह तो ‘अॅनिमल पार्क’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.