मुंबई : ‘मैने प्यार किया’ चित्रपटात सुस्वभावी आणि संस्कारी मुलीची भूमिका साकारून अभिनेत्री भाग्यश्रीने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली होती. भाग्यश्रीने आजही प्रेक्षकांच्या मनात आपली जागा तशीच कायम ठेवली आहे. सध्या भाग्यश्री तिच्या फिटनेसकडेही तेवढेच काळजीपूर्वक लक्ष देते. याचाच प्रत्यय तिच्या चाहत्यांना आता आला असल्याचे दिसत आहे, कारण भाग्यश्रीने लेटेस्ट व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
भाग्यश्री सध्या थायलँडमध्ये तिच्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. त्याचे फोटोदेखील तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे सौन्दर्य आणखीच खुलून दिसत आहे. तिच्या फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.
सुट्ट्यांचा आनंद लुटत तिने फोटो शेअर केले आहेत. भाग्यश्रीने फोटो शेअर करत म्हटले आहे कि, ‘सत्याचे अभयारण्य, सागवानाच्या लाकडापासून बनवलेले भव्य वास्तू, त्यावर अप्रतिम काम करण्यात आले आहे आणि सर्व देवांचे मंदिर. इथेच जीवनातील सात सत्ये सापडतात. इथे आल्यास आपण कधीच चुकणार नाही असा हा अनुभव आहे. लवकरच एक व्हिडीओ पण टाकेन. असे म्हटले आहे.
View this post on Instagram
तिच्या या फोटोला खूप लाइक केले जात आहेत. त्यावर एका चाहत्याने,”फिटनेस क्लीन भाग्यश्री दीदी. एकाने लिहिले आहे की, तुम्ही 50 मध्येही 20 दिसता. असे म्हटले आहे.
‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून भाग्यश्रीने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. यानंतर ती ‘त्यागी’, ‘जन-जाम का साथ’, ‘देवा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, तर आता ती तेलुगू हिंदी चित्रपट ‘राधे श्याम’मध्ये दिसली आहे.