Bollywood: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. नुकतेच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक सेलेब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. मात्र रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या पार्टीतील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या पार्टीत रणबीर कपूर अगदी स्टायलिश अंदाजात पोहोचला होता. यावेळी, ग्रे पँट सूट आणि ब्लॅक कोर्टमध्ये अभिनेता खूपच सुंदर दिसत होता. त्याचवेळी रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टही खूपच स्टायलिश दिसत होती. रॉयल ब्लू कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि स्टायलिश दिसत होती. रणबीर आणि आलियाने पापाराझींसाठी एकत्र पोजही दिल्या. त्यांच्यासोबत रणबीर कपूरची आई नीतू सिंग, आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट देखील उपस्थित होते.
View this post on Instagram
याशिवाय अॅनिमल अभिनेता अनिल कपूरनेही सक्सेस पार्टीमध्ये ग्रँड एन्ट्री केली. यादरम्यान, ते काळ्या रंगाच्या ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होते. फराह खान, प्रेम चोप्रा असे अनेक दिग्गज कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना ‘अॅनिमल’मध्ये मुख्य भूमिकेत होती. याशिवाय अनिल कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल यांसारखे कलाकार दिसले. या चित्रपटात बॉबी देओलने नकारात्मक भूमिका साकारली होती. बॉबीने आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांना प्रभावित केले. या अभिनेत्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होती. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत रणबीर कपूरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 550 कोटींचा व्यवसाय केला आहे.