Entertainment – अभिनेता रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘अॅनिमल’ 1 डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे आता अॅनिमलला रिलीजपूर्वी काही बदल करावे लागणार आहेत.
‘अॅनिमल’ला दिलेले CBFC प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बोर्डाने ‘अॅनिमल’मध्ये 5 बदल सुचवले आहेत. व्हायरल सर्टिफिकेटनुसार, ‘अॅनिमल’च्या निर्मात्यांना विजय आणि झोयाचे इंटिमेट आणि क्लोज-अप शॉट्स डिलीट करण्याची सूचना देण्यात आली आहे. अशात रणबीर कपूरने विजयची भूमिका साकारली आहे, आणि रश्मिका मंदान्नाने झोयाची भूमिका साकारली आहे. इंटिमेट सीननंतर सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटातील ‘वस्त्र’ शब्दाच्या जागी ‘पोशाख’ टाकण्याची सूचना केली आहे.
इतर अनेक शब्द बदलावे लागतील
CBFC ने निर्मात्यांना चित्रपटातील आणखी काही ओळी आणि सबटायटल्स बदलण्याची सूचना केली आहे. याशिवाय अनेक शब्द काढून टाकण्याचेही सांगण्यात आले आहे. ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांन मुलाखतीत आधीच स्पष्ट केले होते की, हा चित्रपट प्रौढांसाठी आहे आणि त्यामुळेच ते आपल्या मुलाला ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी घेऊन जाणार नाही.
हा चित्रपट वडील आणि मुलाच्या विषारी नात्यावर आधारित
‘ऍनिमल’ ही वडील आणि मुलाच्या विषारी नात्याची कथा आहे. चित्रपटात अनिल कपूरने रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका केली आहे तर रश्मिका मंदान्ना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. याशिवाय या चित्रपटात बॉबी देओलचीही महत्त्वाची भूमिका आहे. हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये डब केलेला हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.