bollywood news – ॲनिमलमध्ये रणबीर कपूर लांब केस आणि दाढीसोबत दिसला होता. त्याचा या चित्रपटातील लूकही चाहत्यांना खूप आवडला होता पण आता त्याने आपला लूक बदलला आहे.
रणबीरने क्लीन शेव्ह केले आहे. त्यानंतर तो सावरियानच्या चॉकलेट बॉयच्या लूकमध्ये दिसला होता. अशात नुकताच रणबीर कपूर विमानतळावर एका नव्या लूकमध्ये दिसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रणबीरला क्लीन शेव्हन पाहून लोकांना वाटू लागले आहे की, तो येत्या चित्रपटात चॉकलेट बॉयच्या लूकमध्ये दिसणार आहे. रणबीर कपूर लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह एन वॉरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
लव्ह एन वॉरमध्ये रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या ॲनिमलबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात त्याच्यासोबत बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
रणबीर कपूर हा या नव्या पिढीचा सर्वात आवडता अभिनेता आहे. ‘रॉकेट सिंग’, ‘वेक अप सिड’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘रॉकस्टार’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी तो आजही लक्षात राहतो. जेव्हा रणबीर पहिल्यांदा त्याच्या ‘सावरिया’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आला तेव्हा पासून तो चॉकलेट बॉय म्हणून ओळखू लागला.