Ranbir Kapoor-Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी ख्रिसमसच्या दिवशी आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा सर्वांना दाखवला. काही महिन्यांपूर्वी रणबीर-आलिया यांनी मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवू नये, असे आवाहन केले होते.
मात्र अनेक दिवसांपासून चिमुकल्या ‘राहा’चा (Raha) चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अखेर ख्रिसमसच्या दिवशी आलिया आणि रणबीरने राहाची झलक चाहत्यांना दाखवली. सध्या राहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
निळसर डोळे, नितळ कांती अशा रुपात ही इवलिशी राहा सर्वांच्याच मनात घर करून गेली आहे. राहाला ख्रिसमसच्या निमित्तानं घालण्यात आलेले कपडे, छानसा फ्रॉक, लाल रंगाचे छोटेसे बुट आणि इवलेसे पोनी, त्यावर असणारे फुलांच्या आकाराचे फिकट गुलाबी रंगाचे क्लिप हे सारं सारंकाही फारच गोड होतं अशीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
मुख्य म्हणजे अशीची चर्चा रंगली, की राहाला लावलेले हेअरक्लिप हे रणबीरच्याच एका चाहत्यांनं भेट स्वरुपात दिले होते. RK 82 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून राहाचे फोटो पोस्ट करण्यात आले आणि त्याच्या कॅप्शनमध्ये अशी माहिती देण्यात आली, जी पाहून बरेचजण थक्क झाले.
आलियाच्या लेकिला लावलेले क्लिप्स माझ्याकडूनच देण्यात आले आहेत असा दावा करणाऱ्या चाहत्यानं पोस्ट केलेल्या फोटोनुसार हे क्लिप carter`s नावाच्या वेबसाईटवर मिळतात. मुळची परदेशातील असणारीही ही वेबसाईट Firstcry वरून भारतात व्यवसाय करते. त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे काही सुंदर गिफ्ट घेऊ शकता.