Stock Market Updates 28 December 2023: वर्ष 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग आठवड्यात भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या वाढीसह बंद झाला आहे. एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्समध्ये खरेदीमुळे आज बाजार वाढला. जोरदार खरेदीमुळे बीएसई सेन्सेक्स 371 अंकांच्या उसळीसह 72,410 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 124 अंकांच्या उसळीसह 21,778 वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांसाठी हा उच्चांक आहे.
आजच्या व्यवहारात सर्वात मोठी वाढ निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात झाली. 754 अंकांच्या उसळीसह 56,504 अंकांवर बंद झाला. याशिवाय बँकिंग, ऊर्जा, ऑटो, फार्मा, धातू, इन्फ्रा, कमोडिटी, आरोग्यसेवा, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्सध्येही मजबूत वाढ दिसून आली आहे. आजच्या व्यवहारात फक्त आयटी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स चमकदार राहिले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअरपैकी 38 वाढीसह आणि 12 घसरणीसह बंद झाले.
मार्केट कॅपमध्ये वाढ –
शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळे बाजार भांडवलात मोठी झेप घेतली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 363 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ते गेल्या सत्रात 361.30 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवसायात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.70 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.