मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. सध्या आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच ती या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून एका मुलाखतीत तिने लेक राहाच्या करियरबाबत खुलासा केला आहे.
अवघ्या आठ महिन्यांची असलेल्या राहाच्या करियरचं प्लॅनिंग आलियाने आतापासूनच सुरू केले आहे. तिने एका मुलाखतीत राहाने वैज्ञानिक व्हावे अशी तिची इच्छा असल्याचे सांगितले आहे. “मी तिला सांगते की तू शास्त्रज्ञच होणार आहे,” असे आलिया म्हणाली. या कार्यक्रमात रणवीर सिंग आणि करण जोहर देखील उपस्थित होते. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राहा आई -वडिलांप्रमाणे बॉलीवूडमध्ये करियर न करता आलियाने राहासाठी वेगळा प्लॅन केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आलिया आणि रणबीरचे मागील वर्षी एप्रिल महिन्यात लग्न झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला (राहा) जन्म दिला. अद्याप राहाचा चेहरा कोणालाही दाखवण्यात आलेला नाही. राहाचा चेहरा कोणाला दाखवायचा नाही, असा निर्णय रणबीर आणि आलियाने घेतला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी ही जोडी ‘गली बॉय’मध्ये पाहायला मिळाली होती. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.