मुंबई – साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून निर्मात्यांनी ‘पुष्पा 2 द रुल’ मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे, तेव्हापासून चाहते हा चित्रपट कधी येणार याकडे लक्ष ठेवून आहे. सध्या ‘पुष्पा 2 द रुल’ मधून एक डायलॉग लीक झाला आहे, जो अल्लू अर्जुननेच लीक केला आहे.
अल्लू अर्जुन नुकताच ‘बेबी’ चित्रपटाच्या कार्यक्रमात पोहोचला. या चित्रपटात आनंद देवरकोंडा, वैष्णवी चैतन्य आणि विराज अश्विन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बेबी’ हा चित्रपट 14 जुलै रोजी प्रदर्शित झाला, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात अल्लू अर्जुन बोलण्यात एवढा गुंग झाला कि ‘पुष्पा 2 द रुल’ या आगामी चित्रपटातील डायलॉग बोलून गेला.
अल्लू अर्जुनला त्याच्या आगामी चित्रपटाची एक झलक दाखविण्यास सांगितले होते. त्यानंतर अल्लू अर्जुन म्हणाला की, जरी तो येथे पुष्पाविषयी बोलण्यासाठी आलेला नाही, परंतु तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि म्हणूनच तो ‘पुष्पा 2 द रुल’शी संबंधित एक गोष्ट नक्कीच सांगेल.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2 द रुल’चा डायलॉग बोलतोय, ‘इदंथा जरिगेदी ओकाटे रुले मीडा जरुगुतानादादी,’पुष्पा 2 द रुल’. याचा हिंदीत अर्थ असा आहे की इथे प्रत्येकाला एकच नियम लागू होतो आणि तो म्हणजे पुष्पाचा नियम.
हे ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चाहत्यांनी जलोष केला. त्याचप्रमाणे ‘पुष्पा 2: द रुल’शी संबंधित हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुषा 2 मध्ये अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पराजच्या भूमिकेत दिसणार आहे. सुकुमार दिग्दर्शित, यात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers ने केली असून पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.