नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर बाबत मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने कलम ३७० काढून राज्याला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत त्यांच्या सुप्रसिद्ध शैलीत कविता म्हणत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
रामदास आठवले म्हणाले, ‘आज का दिन नहीं है काला, इसलिए मैं नरेंद्र मोदी और अमित शाह को पहनाता हूं माला।’ आठवले पुढे म्हणाले, ‘मी या विधेयकाचे ठाम समर्थन करतो. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेला हा स्वागतार्ह निर्णय असून याला माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पाठिंबा दर्शविला आहे.