मुंबई – इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली आहे. गुहा म्हणाले की, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आहेत. पण ते सध्याच्या घडीला क्रिकेट फॅंटसी लीगचे प्रतिनिधित्व करत आहेत.
माझ्या मते, ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटपटूंना केवढे पैसाचे आमिष आहे, हे या गोष्टीमुळे सर्वांसमोर येत आहे. अतिरि पैसे कमावण्यासाठी गांगुली यांनी ही गोष्ट करणे योग्य आहे का? जर बीसीसीआयचे अध्यक्षच असे काम करत असतील तर क्रिकेट मंडळामध्ये काय चालत असेल, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो, असे गुहा म्हणाले.