राम शिंदे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क

जामखेड (प्रतिनिधी) : अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी त्याच्या मुळ गावी चौंडी येथे सहपरिवारासोबत सकाळी मतदार केंद्र वर जाऊन मतदान केले यावेळी राम शिंदे याच्या पत्नी आशा शिंदे यांचे औक्षण केले मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.०३ टक्के मतदान झाले आहे

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांसह चौंडी या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदानासाठी नागरिक येत असुन मतदानकेंद्रांवर गर्दी होत आहे नवमतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे दिसत होते. विशेषतः महिला वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.