प्लॅस्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी उपक्रम
पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील मतदान केंद्रांवर महापालिकेकडून “सिंगल युज प्लॅस्टिक’ बाबत जनजागृती केली आहे. त्यासाठी शहरात 7 हजार मतदान केंद्रावर महापालिकेकडून सेल्फी पॉइंट लावले जाणार आहेत. नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर या पॉइंटवर सेल्फी काढून बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणार करणार नाही, म्हणून हे फोटो काढून घ्यायचे असून नंतर ते सोशल मीडियावर अपलोड करावेत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
या ठिकाणी पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचीही नियुक्तीही केली जाणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी स्पष्ट केले.