राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता वर्तवली जाऊ लागली आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबर निंबाळकर यांचे ख्टके उडू लागले आहेत. त्यामुळेच निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा विचार करायला लागले आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. तर भोसले हे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे धाकटे बंधू शिवेंद्रराजे यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना जावळी विधन्सभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूकीचे तिकीट मिळण्याची शक्‍यता अधिक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरिही दोघेही सार्वजनिक कार्यक्रमांमधून एकमेकांवर उघड टीका करत राहिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निंबाळकर यांचे जावई राहुल नारवेकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आहेत. तर त्यांचे बंधू आणि राहुल नारवेकर यांच्य पत्नी या बृहन्मुंबई महानगरपलिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतरही निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती म्हणून कार्यरत राहण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.

राज्यात सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या विखे पाटील यांना जून महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळात गृह उद्योग मंत्री म्हणून समाविष्ट करून घेण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही मोठे नेते अलिकडच्या काळात शिवसेना किंवा भाजपामध्ये गेले आहेत. तर काही अजूनही कुंपणावरच बसून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)