राजगुरुनगर – राक्षेवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांना व्यावहारिक ज्ञान व्हावे. यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सुरुवात सरपंच सोनाली सांडभोर यांच्या हस्ते झाली.
शाळेतील मुले ही शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी त्यांच्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी आनंद मेळाव्यात ठेवला होता. तो खरेदी करण्यासाठी पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी सरपंच सोनाली सांडभोर, पोलीस पाटील पपू राक्षे, ग्रामपंचायत सदस्या सोनल राक्षे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक राक्षे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.