मुंबई – बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर नेहमीच धुमाकूळ घालतात. नुकतच, राखी सावंतचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री विचित्र वेशात कोविडचा बूस्टर डोस घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली आहे. राखीने बनावट तपकिरी रंगाच्या केसांचा विक घातला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणतेय, “आज मी बूस्टर घ्यायला आले आहे. सगळीकडे लोक खूप आजारी पडत आहेत. ताप, ताप…” इंजेक्शन पाहून ती किंचाळते. मात्र, इंजेक्शन घेतल्यानंतर राखी व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “मी आजारी पडू नये म्हणून मी आज बूस्टर घेतला आहे. मी सतत प्रवास करत आहे.”
View this post on Instagram
राखी सावंतचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असून लोक त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री मला कायदा मंत्री बनवा असे म्हणत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणतेय, “मला कायदा मंत्री करा, माझ्या देशात एकही बलात्कार होणार नाही. मी माझ्या देशातील मुलांसाठी इतका कडक कायदा करेन की, एकही बलात्कार होणार नाही. असं राखी यावेळी म्हणते.
View this post on Instagram
अभिनेत्री राखी सावंत सध्या तिचा बॉयफ्रेंड आदिलमुळे खूप चर्चेत असते. नुकतेच दोघांनी डेटिंग सुरू केली आहे. दोघेही प्रत्येक पार्टीत एकत्र दिसतात. राखी आदिलसोबतच्या नात्याचा आनंद घेत आहे.