मुंबई – हेमा मालिनी यांना पत्रकारांनी कंगना राणावत मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता हेमा मालिनी यांनी राखी सावंतचे नाव घेत मिश्किल सूतोवाच केला होता. त्यानंतर आता राखी सावंतने हेमा मालिनीचे आभार मानत, मी स्मृती इराणी पार्ट २ होणार असल्याचे म्हंटले आहे. राखीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ सुरु झाला आहे.
राखीने आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणते,” मी मे 2022 मधील निवडणूका लढवणार आहे. ही गोष्ट सिक्रेट होती. ही घोषणा देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अमित शाहा करणार होते. मात्र, माझं भाग्य की माझी ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांनी हे जाहीर केले की यावेळची निवडणूक मी लढवणार आहे.” आता मी स्मृती इराणीं भाग 2 बनणार आहे. मी निवडणूक लढवणार आहे याचा मला आनंद आहे, कृपया मला पाठिंबा द्या असे म्हणत राखीने व्हिडिओमध्ये हेमा मालिनींचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
काय म्हणाल्या होत्या हेमा मालिनी नेमकं
हेमा मालिनी या तब्बल २ वेळा उत्तर प्रदेशातील मथुरेमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांना कंगनाच्या निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता त्यांनी मिश्किल टिपण्णी केली. कंगना मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटत असा सवाल हेमा मालिनी यांना विचारला असता त्या म्हणाल्या, “खूप चांगली गोष्टी आहे,उद्या राखी सावंत देखील खासदार होऊ शकते” असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.