मुंबई – अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या-कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या वैवाहिक जीवनात मोठे संकट आले होते. मारहाण आणि फसवणूक केल्याप्रकरणी तिच्या पतीला अटकही करण्यात आली. मात्र हे सर्व विसरून तिने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे. नुकतेच तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये राखी एअरपोर्टवर नाश्ता करताना दिसते. मात्र हा नाश्ता तिला चांगलाच महागात पडला आहे. राखी तेथील एका दुकानदाराकडून इडली सांबार विकत घेते. त्यानंतर राखी त्याला “पैसे किती झाले?” असं विचारते. यावर दुकानदार 600 रुपये झाल्याच सांगतो. ही रक्कम ऐकून राखी आवाक होते. यावर ती त्या दुकानदाराला म्हणते, “तू वेडा झाला का? एक इडली आणि एक वड्यासाठी हा 600 रुपये मागतोय. मला मूर्ख बनवतोय.”
यावर दुकानदार इडली ,वडा, पाण्याची बाटली आणि मँगो ज्यूस या सगळ्याचे मिळून 600 रुपये घेतल्याचे राखीला सांगतो. मात्र तरीही फक्त एवढ्या वस्तूंची 600 रुपये म्हणजेच जास्तच महाग असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहे.
View this post on Instagram
मात्र यावरून राखीला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही जणांनी तिच्या ड्रामेबाजीवर टीका केली आहे. ‘एअरपोर्टवर पहिल्यांदाच आली का? येथे हे महागच मिळते’ अशी कमेन्ट एका नेटकऱ्याने केली आहे. तर काही जण तिला रमजानच्या महिन्यात रोजा न ठेवल्याने तिला ट्रोल करत आहे. सध्या राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.