कोलकाता – गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरिओ यांना तृणमुल कॉंग्रेसने बंगाल मधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. फालेरिओ यांनी नुकताच कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन तृणमुल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
राज्यसभेची ही पोटनिवडणूक 29 नोव्हेंबर रोजी होंत आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत तृणमुल कॉंग्रेस यंदा प्रथमच जोरदारपणे आपले नशिब अजमावत आहे.
त्यासाठी त्यांनी तेथे मोठी तयारी सुरू केली असून गोव्यातील स्थानिक नेतृत्वाला थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन तृणमुलने गोव्यातील आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.
गोव्यात त्यामुळे आता भाजप, कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमुल कॉंग्रेस अशी चौरंगी लढत होणार आहे. या लढतीत आता त्यामुळे चांगलाच रंग भरेल असे मानले जात आहे.