आण्विक शस्त्राबद्दलचे धोरण, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

पोखरण (राजस्थान) : जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद-370 हटवल्यानंतर पाकिस्तानने कुरापती सुरु केल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानशी संबंध तणावपूर्ण होत असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. अण्वस्त्राचा आपणहून पहिले वापर करणार नसल्याच्या तत्वाशी भारत आतापर्यंत कटिबद्ध राहिला आहे. मात्र भविष्यात परिस्थिती पाहून याबाबतचा पुनर्विचार केला जाईल असं मोठं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये केलं आहे.

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं राजनाथ सिंह यांनी पोखरणला जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.