सासवड – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सासवडचे पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले.
महाविद्यालयातील छात्रसैनिकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. या प्रसंगी छात्रसैनिकांनी शानदार संचलन केले. सिनिअर अंडर ऑफिसर वैभव पोमण याने छात्रसैनिकांच्या संचलनाचे नेतृत्व केले. प्लाटून नंबर 1 राफल प्लाटून परेड कमांडर सिद्धार्थ इनामके, फ्लॅग होल्डर स्वप्नील मेमाणे, प्लाटून नंबर 2 अक्षदा बधे, फ्लॅग होल्डर कोमल जगताप, प्लाटून नंबर 3 प्रताप बालवडकर, फ्लॅग होल्डर संदीप कुंभारकर, प्लाटून नंबर 4 शुभांगी शिवरकर, प्लाटून नंबर 5 स्नेहल कामथे, प्लाटून नंबर 6 स्नेहल सोनवणे, प्लाटून नंबर 7 आकाश बनकर प्लाटून नंबर 8 प्रणव पवार यांनी प्लाटून तुकड्यांचे नेतृत्व केले.
या प्रसंगी याप्रसंगी ऍड. प्रताप कदम, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. आर. वाय. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस व्ही. ढगे, एन.सी.सी. प्रमुख लेफ्टनंट कमांडर डॉ. सतीश बोंगाणे (नेव्ही एन.सी.सी.), प्रा. कैलास मेमाणे, डॉ. भाग्यश्री नाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे, रमा गांगुर्डे, प्रा. एस. एस. नाळे उपस्थित होते.