दोन वर्षांपूर्वी “बधाई हो’ खूप गाजला होता. त्याचाच सिक्वेल आता “बधाई दो’ या नावाने येतो आहे. यामध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची जोडी निश्चित झाली आहे. या वर्षी जूनमध्ये या नव्या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे आणि पुढच्यावर्षी हा सिक्वेल रिलीज होणार आहे, असे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. “बधाई दो’ हा एक फॅमिली ड्रामा असणार आहे आणि असामान्य रिलेशनशीप आणि कमिटमेंटची धमाल असणार आहे.
“बधाई हो’ आणि “बधाई दो’ या दोन्ही सिनेमांचे केवळ शिर्षक सारखे असणार आहे. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. दोन्हींच्या कथा वेगवेगळ्या असणार आहेत. दोन्हींमधील कलाकार आणि भूमिकाही वेगवेगळ्या असणार आहेत. दोन्हींच्या कथासारामध्येही काही विशेष साम्य असणार नाही आहे.
केवळ दोन्ही सिनेमे कौटुंबिक वातावरणातील कथानकावर आधारलेले आहेत, एवढीच एक गोष्ट दोन्ही सिनेमांमध्ये सारखी आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने आतपर्यंत लक्षात येण्या जोगा एकत्र सिनेमा केलेला नाही. कॉमेडीचा अनुभव दोघांनाही आहे. त्यामुळे लवकरच यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळेल.