मुंबई – ‘थप्पड से डर नाही लगता सहाब…’ असे म्हणत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ‘सोनाक्षी सिन्हा’चा अॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
View this post on Instagram
तिने तिच्या अप कॉमिन्ग प्रोजेक्टबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सोनाक्षी या सीरिजमध्ये हटके अंदाजात दिसणार आहे. या वेबसीरीजमध्ये सोनाक्षी खाकी वर्दीतील महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरींजमधून तिचा दबंग अंदाज प्रेक्षकाना बघायला मिळणार आहे.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हासह या वेबसीरीजमध्ये अभिनेता विजय शर्मा , गुलशन देवया आणि सोहम शहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेबसीरीजचे दिग्दर्शन रिमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी केले आहे.
View this post on Instagram
तिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायच तर, अजय देवगणच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.