साखर अपहारप्रकरणी राजीव मोरे यास अटक

कराड  – वेदिका सेल्स कार्पोरेशनच्या लेटर पॅडवर परस्पर डिलीवरी ऑर्डर नंबर बनवून सुमारे वीस लाख रुपये किमतीच्या साखरेचा परस्पर अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी राजीव मोरे याला अटक करण्यात आली असून त्याला दि. 30 पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे.

याबाबतची फिर्याद व्यापारी जवानमल छोगलालजी जैन (वय 63, रा. पुणे) यांनी कराड तालुका पोलिसात दिली आहे. जवानमल जैन हे नवकार ट्रेडर्सच्या नावाने साखर खरेदी विक्रीचा घाऊन व्यवसाय करतात. तर राजीव मोरे याचे वेदिका सेल्स कार्पोरेशन नावाने दलालाचे काम करतो. दि. 4 मे व दि. 8 मे रोजी राजीव मोरे याने जैन यांच्या नावे कृष्णा साखर कारखान्यातून वेदीका सेल्स कार्पोरेशन यांचे लेटर पॅडवर परस्पर डिलीवरी ऑर्डर बनवून कारखान्यातून साखर नेली.

त्यानंतर जैन यांनी माल अथवा पैसे कारखान्यात किंवा जैन यांच्याकडे जमा करण्यासाठी तगादा लावला असता मोरे याने सदरची रक्कम आरटीजीएसने खात्यावर जमा करतो, असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने जवानमल जैन यांनी कराड तालुका पोलिसात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी राजीव मोरे याला सोमवारी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

20 लाखांच्या साखरेचा केला होता अपहार

जवानमल जैन हे नवकार ट्रेडर्सच्या नावाने साखर खरेदी विक्रीचा घाऊक व्यावसाय करतात. ते कृष्णा साखर कारखान्याकडून 4 मे पासून साखर खरेदी करीत आहेत. त्यासाठी राजीवर मोरे हा वेदिका सेल्स कार्पोरेशन नावाने हा दोघांच्यामध्ये दलाल म्हणून काम पाहत होता. जैन यांनी साखर कारखान्याच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खात्यावर अनामत रक्कम भरल्यानंतर साखर खरेदी केली जात होती. जैन हे साखर खरेदीपूर्वी राजीव मोरे यास संदेश पाठवून गाडी क्रमांक पाठवून देत होते. त्याप्रमाणे तो ती गाडी भरून पाठवून देत होता. 4 मे व 8 मे रोजी राजीव मोरे याने जैन यांच्या नावे कृष्णा साखर कारखान्यातून कोणताही मेसेज नसतानाही वेदिका सेल्प कार्पोरेशन यांचे लेटर पॅडवर परस्पर डिलीवरी ऑर्डर डी. ओ. नंबर 114, 139 बनवून कारखान्यातून साखर भरलेल्या गाडीने त्यांनी पाठवून दिलेला माल जैन यांना मिळाला नसल्याने त्यांनी 14 रोजी कारखान्यातून खात्याचा तपशील घेतला. फोनवरून मोरे याने सांगितले की कारखान्यातील रजिस्टर व नोंदीत काहीतरी गोंधळ आहे. त्यावर जैन यांनी त्या खात्याचा तपशील आणला असता त्यावर माल घेऊन गेला आहात असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.