Rajasthan – राजस्थानमधील (Rajasthan) हनुमानगड जिल्ह्यात कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात (accident) झाला. या दुर्घटनेत चार महिलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
परमजीत कौर (60), खुशविंदर सिंग (25), परमजीत कौर (22), मनजोत सिंग (5), रामपाल (36), रीना (35) आणि रीत अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण हनुमानगडमधील नौरंगदेसर गावातील रहिवासी होते.
हनुमानगड जिल्ह्यातील लखुवली-शेरगड मेगा हायवेवर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.