जयपूर –राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये कॉंग्रेस नेते सचिन पायलट लोकांना कॉंग्रेसला मत देण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
सचिन पायलट यांचा व्हिडीओ गेहलोत यांनी शेअर करून मतदारांना आवाहन करणे ही कृती म्हणजे कॉंग्रेस मध्ये आता कोणतीही गटबाजी उरलेली नसून पक्ष एकसंध आहे हे दाखवून देण्यासाठीची क्लुप्ती आहे असे मानले जात आहे.
या राज्यात उद्या मतदान होत आहे. राजस्थानात पायलट आणि गहलोत यांच्यात राजकीय स्पर्धा आहे, त्यातून त्यांच्यात मोठे वितुष्ठ असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याच संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यावर टीका केली होती.
कांग्रेस के युवा नेता सचिन पायलट जी की राजस्थान के लोगों से कांग्रेस को वोट देने की अपील।@SachinPilot#कांग्रेस_की7गारंटी#कांग्रेस_फिर_से pic.twitter.com/3bS1PaOhbg
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 24, 2023
या पार्श्वभूमीवर गहलोत यांनी पायलट यांचा व्हिडीओ शेअर करण्यास राजकीय महत्व आहे. गेहलोत यांनी सुमारे दोन मिनीटांचा हा व्हिडीओ, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्सवरही शेअर केला आहे.
या व्हिडीओ मध्ये पायलट हे मतदारांना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत असून राज्यात पुन्हा कॉंग्रेस पक्षच सत्ता स्थापन करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ज्या विधानसभा मतदार संघात मी प्रचाराला पोहचू शकलो नाही त्या उमेदवारांनाहीं लोकांनी विजयी केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.