नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात मंजूर केलेला अंतरिम जामीन 4 डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. त्यानंतर त्यांच्या नियमित जामिनासाठीच्या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने जैन यांच्या अंतरिम जामिनाची मुदत 9 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.
अंमलबजावणी संचालनालयाने असा दावा केला आहे की, आप नेत्याचा जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याच्या कारणास्तव ट्रायल कोर्टात वारंवार स्थगिती मागितली होती. जैन यांनी ट्रायल कोर्टाकडून तब्बल 16 तारखा घेतल्याचा आरोप तपास संस्थेने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मे रोजी जैन यांना मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. सत्येंद्र जैन यांना ईडीने गेल्या वर्षी 30 मे रोजी अटक केली होती.