जयपूर : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा करोनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, जयपूरमधून एक मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये गेहलोत यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोविडची-19 प्रकरणे वाढली आहेत. मला स्वतःला सौम्य लक्षणांसह कोविडची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवस माझ्या निवासस्थानातून काम करत राहीन. तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.
पिछले कुछ दिनों में देशभर में कोविड के मामले बढ़े हैं। मैं स्वयं भी हल्के लक्षणों के साथ कोविड से संक्रमित हो गया हूं। डॉक्टरों की सलाह के अनुसार अगले कुछ दिन निवास से ही कार्य जारी रखूंगा। आप सब सावधानी बरतें एवं कोविड प्रोटोकॉल का पालन करें।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) April 4, 2023
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी एक दिवस आधी राहुल गांधींचे सुरतमध्ये स्वागत केले होते. न्यायालयात जाताना ते राहुल गांधी यांच्यासोबत गेले आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते.