रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा दिल्ली कपिटल्सवर विजय

पृथ्वी शॉ व शिखऱ धवनकडून निराशा

मुंबई – फलंदाजांची मोठी फौज असलेल्या दिल्ली कपिटल्सला १४७ धावांवर रोखल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना सोपा ठरेल असं चित्र होत. मात्र अवघ्या १४८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगलेच दमवले. राजस्थानवर  पराजयाची नामुष्की ओढवते कि काय असे चित्र असतानाच  ख्रिस मॉरिसने १८ चेंडूत ३६ धावांची तडाखेबाज फलंदाजी करत राजस्थानचा विजय सुनिश्चित केला.

राजस्थानला देखील दिल्लीप्रमाणेच सुरुवातीलाच झटके बसले. ख्रिस वोक्‍सने सलामीवीर मनन वोहरा (9) व जॉस बटलर (2) यांना तिसऱ्या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (4) देखील गेल्या सामन्यातील फॉर्म कायम ठेऊ शकला नाही. संघाची धावसंख्या 90 असताना राजस्थानने 6 गडी गमावले होते. अशातही डेव्हिड मिलर(६२) याने राजस्थानला सामन्यात टिकवून ठेवले होते. मिलर बाद झाल्यानंतर राजस्थानच्या अडचणी आणखी वाढल्या.

परंतु ख्रिस मॉरिसने १८ चेंडूत ३६ धावांची तडाखेबाज फलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भरात असलेल्या दिल्लीला प्रथम फलंदाजी देण्याचा धाडसी निर्णय राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने घेतला व गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वात धोकादायक सलामीची जोडी पृथ्वी शॉ व शिखर धवन यांना जयदेव उनाडकटने तंबूत धाडली. तर कर्णधार ऋषभ पंतने अर्धशतकानंतर अनावश्‍यकरीत्या चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केल्याने राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 8 बाद 147 धावांवर रोखले. 

त्यानंतर मधल्या फळीतील आश्‍वासक फलंदाज अजिंक्‍य रहाणेलाही त्यानेच बाद केले. त्याचवेळी मिस्तफिजूर रेहमानने अष्टपैलु मार्कस स्टोनिसलाही बाद करत दिल्लीची अवस्था 4 बाद 37 अशी अत्यंत बिकट केली. त्यानंतर कर्णधार पंतने ललित यादवच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंतने विशेषतः आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतकही थाटात साकार केले.

मात्र, विनाकारण चोरटी धाव घेताना तो धावबाद झाला. पंतने आपल्या 51 धावांच्या खेळीत 32 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर ललित यादवही फार काळ टीकू शकला नाही. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. यादवने 24 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर टॉम कुरेन व ख्रिस वोक्‍स यांनी जबाबदारीने फलंदाजी केली.

वोक्‍स जास्त आक्रमक होता मात्र, त्याने मोठ्या फटक्‍यांबरोबरच एकेरी व दुहेरी धावांवरही भर दिला व धावफलक हलता ठेवला. कुरेन डोईजड ठरणार असे वाटत असतानाचा मुस्तफिजूरने त्याला 21 धावांवर बाद केले व राजस्थानच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. त्यानंतर वोक्‍सला साथ देत रवीचंद्रन अश्‍विननेही धावफलक हलता ठेवला. मात्र, तो देखील धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या कागिसो रबाडाने वोक्‍सला साथ देत संघाला 147 धावांची मजल मारुन दिली.

वोक्‍स 11 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावांवर तर, रबाडा 9 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून जयदेव उनाडकटने 3 गडी बाद केले. त्याला साथ देताना मिस्तफिजूर रेहमानने 2 बळी घेतले. ख्रिस मॉरिसने 1 गडी बाद केला.

सॅमसनचा अफलातून झेल

राजस्थानचा यष्टीरक्षक कर्णधार संजू सॅमसन याने शिखर धवनचा अत्यंत अफलातून झेल घेतला. जयदेव उनाडकट याच्या गोलंदाजीवर उडालेली झेल सॅमसनने उजवीकडे सूर मारत पकडला. हा झेल कसा घेतला गेला असा प्रश्‍न खुद्द धवनलाही पडला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.