फेस मास्क वापरता तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

पुणे: कोरोना (covid) विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरामध्ये कैद झाले असून, वर्क फ्रॉम होम करत आहेत. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी WHO कडून वेळोवेळी गाइडलाईन्स जारी केल्या जातात.

दरम्यान, आता वर्क फ्रॉम होमनंतर ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास सुरुवात केली असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर ते ऑफिस असा प्रवास करताना कोरोना (covid) विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी फेस मास्क (face mask) वापरणं अतिशय गरजेचं आहे. दरम्यान, WHO कडून फेस मास्कबाबत (face mask) काही महत्वाची माहिती जारी करण्यात आली असून, आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत…

रिस्क फॅक्टर असलेल्या लोकांना मेडिकल मास्क (face mask) आणि इतर सर्वच लोकांनी तीन लेअर असलेला फॅब्रिक मास्क (face mask) वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून संक्रमण पसरवणाऱ्या ड्रॉपलेट्सपासून तुमचा बचाव व्हावा.

फॅब्रिक मास्कचा (face mask) वापर केला जात असेल कमीत कमी तीन लेअर असणं गरजेचं आहे. हे तीनही लेअर वेगवेगळ्या मटेरिअलचे बनलेले असतात. ज्यात चेहऱ्याजवळची लेअर कॉटनची, दुसरी लेअर पॉलीप्रोपाइलीन आणि तिसरी लेअर सिंथेटीकची असते.

WHO नुसार, होममेड फॅब्रिक मास्क (face mask) व्हायरसपासून 70 टक्के सुरक्षा प्रदान करतो. हा मास्क (face mask) आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, कोरोना (covid) पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी अजिबात चांगला नाही.

फॅब्रिक मास्क (face mask) वापरण्याची एक पद्धतही आहे. WHO च्या व्हिडीओत सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही फॅब्रिक मास्क (face mask) वापरत असाल तर तो वापरण्याची योग्य पद्घत तुम्हाला माहीत असली पाहिजे.

सर्जिकल मास्क (face mask) किंवा फॅब्रिक मास्क (face mask) हा त्या सर्वच लोकांनी वापरावा जे कोविड 19 संक्रमण झोनमध्ये आहेत. तसेच जिथे पब्लिक प्लेसवर फिजिकल डिस्टेंसिंग 1 मीटरपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

तसेच, मास्क (face mask) लावण्याआधी आपले हात सॅनिटायजरने किंवा साबणाने स्वच्छ धुवावे. मास्कच्या (face mask) मधल्या भागाला हात लावू नका. मास्कला (face mask) जितक्यांदा हात लावाल तेवढ्या वेळा हात सॅनिटाइज करा किंवा धुवावे. तसेच मास्क (face mask) काढल्यावरही हात धुवावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.