BJP Rajasthan New CM, Two deputy CM and speaker name Announcement : गेल्या काही दिवस राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम होता. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामुळे राजस्थानमधील स्पर्धा अधिकच रंजक झाली होती. दरम्यान, अखेर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा संपली आहे.
राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बरीच चर्चा सुरू होती. मध्य प्रदेशातील मोहन यादव यांच्याप्रमाणे भाजप मुख्यमंत्री म्हणून नव्या नावाची घोषणा करू शकते, असे बोलले जात होते आणि तसेच घडलं आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपने ही घोषणा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. वसुंधरा राजे यांनीच भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
श्री @BhajanlalBjp को राजस्थान भाजपा विधायक दल का नेता चुने जाने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
हमें पूर्ण विश्वास है कि प्रधानमंत्री श्री @narendramodi के मार्गदर्शन एवं आपके कुशल नेतृत्व में राजस्थान विकास के पथ पर तीव्र गति से अग्रसर होगा एवं उन्नति के नये आयाम हासिल करेगा। pic.twitter.com/OKfgcMPuwl
— BJP Rajasthan (@BJP4Rajasthan) December 12, 2023
दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा…
राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री, तर वासुदेव देवनानी विधानसभेचे अध्यक्ष असतील.
कोण आहेत भजनलाल शर्मा…?
भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) हे सांगानेरचे आमदार असून पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर ते आता थेट राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहेत. भजनलाल शर्मा हे भरतपूरचे रहिवासी आहेत. बाहेरचे असल्याचा आरोप असतानाही ते सांगानेरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात. राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असणारे भजनलाल शर्मा हे 56 वर्षांचे असून ते सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शर्मा हे भाजपचे प्रदेश सरचिटणीसही आहेत.