BJP-MNS Seat Sharing | लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसून येतायेत. काल याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत येण्यावर चर्चा झाली.
राज ठाकरेंनी तीन जागेंवर मागणीही केली आहे, यामध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल बुधवारी मध्यरात्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट अज्ञातस्थळी झाली. सुमारे ३० ते ४५ मिनिटे दोन्ही नेते एकत्र होते. यामुळे या प्रकारबद्दल उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, आज ताज लॅन्डसच्या बैठकीत राज ठाकरे उपस्थित होते. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् एँडस येथे ही बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल. अशात अशी माहिती समोर येत आहे की, मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी जागा मिळणार आहे. दक्षिण मुंबई येथे अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे तर, शिर्डीच्या जागेवर बाळा नांदगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे. आज लॅन्डस येथे झालेल्या बैठकीनंतर शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
हे वाचले का ? ‘आमच्याकडे 2 रुपये नाहीत, निवडणुकीच्या तोंडावर आमचे बँक अकाऊंट गोठवली’