मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पराभवाची धूळ झटकून नव्या जोमाने कामाला लागले आहेत. राज ठाकरे हे नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, 23 जानेवारीला मनसेचे पहिले महाअधिवेशन आयोजित केले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.
मनसेचे हे पहिले महाअधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते सहभागी होती असा अंदाज वर्तवला जात आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी रोजी जन्मदिवस आहे. यानिमित्ताने राज ठाकरे मुंबईत महाअधिवेशन घेणार आहेत. या दिवशी पक्षाचे महाअधिवेशन आयोजित करण्यामागे राज ठाकरे यांचा हेतू काय? पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. तसेच पक्षाच्या 13 वर्षांच्या वाटचालीतील हे पहिले महाअधिवेशन आहे.