मुंबई – दबंग 3 मध्ये सलमान खान आणि सुदीप यांचे जोरदार ऍक्शन सीन प्रेक्षकांना दिसणार आहेत. 20 डिसेंबरला दबंग 3 चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर यातच सोशल मीडियावर सुद्धा सलमानला टक्कर देण्यासाठी छोटू दादा देण्यासाठी आला आहे.
फेमस यू ट्यूबर छोटू दादा यांनी दबंग 3 या चित्रपटातील चूलबुल पांडेच्या भूमिकेवर छोटू दादाने स्पूफ वीडियो बनविला आहे या व्हिडीओमध्ये सलमानच्या भूमिकेला अनुसरून कॉमेडी करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडियो चांगलाच वायरल होत आहे. काही क्षणातच या विडिओला कोटींच्या घरात लाईक मिळाले आहे.