मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ब्रिच कॅंडी रुग्णालयात दीदींवर उपचार सुरु आहे. त्यांच्यावर डॉ. फारूक उदवाडीया यांच्या नेतृत्वाखालील पथक उपचार करत आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी (13 नोव्हेंबर) दिली आहे.
दरम्यान, दीदींच्या उत्तम आरोग्यासाठी मनसे अध्यक्ष्य ‘राज ठाकरे’ यांनी प्रार्थना केली आहे. राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. “दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय”. असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.
दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. @mangeshkarlata #getwellsoon
— Raj Thackeray (@RajThackeray) November 14, 2019
आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली ७७ वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.@mangeshkarlata #LataMangeshkar pic.twitter.com/55ePXn93Kw
— Raj Thackeray (@RajThackeray) September 28, 2019