#व्हिडिओ: विद्यार्थ्यांकडून ‘चरणसेवा’ पाच वर्षांचा कारावास

पाय चोपतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

अकोला: शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणाऱ्या शिक्षिका शीतल अवचार हिला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच खटला आहे.

अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शासकीय मुकबधीर विद्यालयात कार्यरत शीतल अवचार ही महिला शिक्षिका मुकबधीर विद्यार्थ्यांकडून पायांची मालीश करून घेत होती. माध्यमांत याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिका आणि तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मलकापूर परिसरात असलेल्या शासकीय मूकबधीर विद्यालयात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांने १३ ऑक्टोबर २०१३ रोजी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने शीतल अवचार हिला पाच वर्षे कारावासाची शिक्षा आणि 30 हजार रुपये दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे पाय चोपतानाचा व्हिडिओ शाळेतील मुलांनी काढला होता त्याआधारे शीतल अवचार हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.