Raj Thackeray On Maratha Reservation : राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या भोवती फिरत आहे. असे असतानाच मराठा आरक्षणासाठी उद्या ( 20 फेब्रुवारी ) विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंना विचारले असताना अधिवेशनातून काहीही होणार नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील शारदाश्रमातील शिक्षकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांनी निवडणूक कामात गुंतविले जात असल्याची व्यथा ठाकरेंनी मांडली. यावर आक्षेप घेत राज ठाकरे यांनी निवडणूक विभागासह सरकारला धारेवर धरले. | Raj Thackeray On Maratha Reservation
मराठा आरक्षणाबाबतच्या विशेष अधिवेशनाबाबत राज ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, अशा अधिवेशनाने काहीही होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच. हा केंद्राचा विषय आहे, सर्वोच्च न्यायालयातील विषय आहे. मी मागच्या वेळेला सांगितले होते की, यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. | Raj Thackeray On Maratha Reservation
त्या सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत. हे सगळं झुलवले आणि भुलवले जात आहे. यातून हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्या (मनोज जरांगे पाटील) समोरच जाऊन सांगितले होते ना की, काहीही होणार नाही, असे म्हणत ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. | Raj Thackeray On Maratha Reservation