भवानीनगर -बारामती शहर परिसरात बुधवारी (दि. 13) रात्री जोराच्या वाऱ्यासह व गारांसह एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला. रात्री सव्वाआठच्या दरम्यान अचानक जोरदार वारा वाहू लागला व यानंतर गारांसह पावसाने पडण्यास सुरुवात केली. साधारण दीड तास बारामती परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.
काही ठिकाणी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे पडली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक वाहनचालक आहे त्याचठिकाणी अडकून पडले होते. बारामती परिसरातील शेतामध्ये पाणी साठले असून शेतकऱ्यांना या पाऊसामुळे शेतातील पिकांना पाणी मिळाले आहे. इंदापूर तालुक्यात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या बारामतीकरांना गारवा अनुभवण्यास मिळाला.